Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर शिक्षक भरती घोटाळा; ३६ संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर

Advertisement

नागपूर – दहावी व बारावी परीक्षांच्या निकालांमध्ये सातत्याने मागे राहणाऱ्या नागपूर विभागामागे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशिक्षित किंवा अपात्र शिक्षकांची शाळांमध्ये नियुक्ती करून त्यांना वेतन देण्यासाठी बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पोलिस तपासात सुमारे ६८१ शिक्षकांचे शालार्थ आयडी नियमबाह्य पद्धतीने मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये शिक्षण विभागातील काही अधिकारी, मुख्याध्यापक आणि ३६ शिक्षण संस्थाचालक थेट सहभागी असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण आता विशेष तपास पथकाच्या (SIT) रडारवर आहेत.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या रॅकेटचा सुरुवातीचा तपास सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीतून सुरू झाला होता. तेव्हा ५८० बनावट आयडी असल्याचे आढळले होते. मात्र SIT च्या सखोल तपासानंतर हा आकडा वाढून ६८१ पर्यंत पोहोचला आहे. शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि छाननी समित्यांची परवानगी न घेता ही आयडी मंजूर करण्यात आली होती.

भंडाऱ्यातील संस्थाचालक चरण चेटुले याला अटक झाल्यानंतर हे रॅकेट आणखी उघडकीस आले. चौकशीतून असेही समोर आले की, शाळा सुरू होण्याआधीच शिक्षकांची भरती करून त्यांच्या नावावर वेतन उचलण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. यामध्ये संस्थाचालक, सचिव, मुख्याध्यापक आणि प्रशासनातील अधिकारी हातमिळवणीने सहभागी होते.

Advertisement

नवीन शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणामुळे पूर्व विदर्भातील अनेक शैक्षणिक संस्थांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत आरोपी शिक्षकांना चौकशीसाठी बोलावले जाणार असून, अजून अनेक नावे उघड होण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.