
नागपूर : अवघ्या 10 रुपयांच्या चहाच्या पैशावरून झालेल्या किरकोळ वादाने भीषण वळण घेत एका निष्पाप तरुणाचा जीव घेतला. कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहारे पेट्रोल पंपाजवळ चहा विक्रेता कैलाश गणवीर याने ग्राहक मनोज विश्वनाथ यादव याच्या गळ्यावर धारदार चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, ज्या परिसरात काही तासांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम झाला होता, त्याच परिसरात ही रक्तरंजित घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चहाचे 10 रुपये देण्याच्या कारणावरून कैलाश गणवीर आणि मनोज यादव यांच्यात शाब्दिक वाद झाला. क्षणार्धात हा वाद हाणामारीत बदलला. संतापाच्या भरात आरोपीने धारदार चाकू काढून मनोजच्या गळ्यावर वार केला. गळ्यावर गंभीर जखम झाल्याने मनोज यादव याचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कपिल नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी कैलाश गणवीर याला काही वेळातच अटक केली. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचा शासकीय कार्यक्रम संपल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याच परिसरात घडलेल्या या हत्येमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...
मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime
मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर
वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...
नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...
रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra




