Published On : Thu, Jul 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर हादरले ; दोन तरुण व्यापार्‍यांचे अपहरण करून हत्या, वर्धा नदीत फेकलेले मृतदेह आढळे !

Advertisement

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत हत्यांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. शहरात २४ तासातील ही तिसरी घटना आहे. शहरातून अपहरण झालेल्या दोन तरुण व्यापाऱ्यांची वर्धा येथे हत्या करण्यात आली .त्यांचे मृतदेह तळेगावजवळ वर्धा नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हे दोन्ही तरुण काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. आता दोघांची निर्घृण हत्या झाल्याचे आढळून आल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली. या दोन तरुणांपौकी एकाचा मुतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध घेणे सुरु आहे.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, या दोन व्यापार्‍यांच्या नावाची पुष्टी अद्यापही करण्यात आलेली नाही. अगोदर त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची हत्या करून त्याचे मृतदेह नदीत फेकण्यात आले.

नागपुरातील बिर्डी आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींची बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी ताबडतोब शोध मोहीम सुरू केली, परंतु गुरुवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह वर्धा नदीतून सापडल्याची माहिती समोर आली.

अपहरण आणि त्यानंतरच्या हत्येमागील हेतू अद्याप अस्पष्ट असून . पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement