नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वानाडोंगरी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मातोश्री नगरमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी पंकज ठाकूर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला जाब विचारल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२ एप्रिल) दुपारी ठाकूर यांनी परिसरात वारंवार फिरणाऱ्या आकाश मंडल या तरुणाला विचारणा केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आकाशने आपल्या साथीदारांसह रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ठाकूर यांच्या घराजवळ येत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉडने छातीवर वार केल्याने ठाकूर गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांच्या काही नातेवाईकांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून किरकोळ कारणावरून एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आकाश मंडल आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे
.
या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून “जेथे पोलीसच सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिकांचे काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate



