Published On : Sat, Mar 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ग्रामीण पोलिसांचा निर्णय;बारावी पेपरफुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे!

संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम
Advertisement

नागपूर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाला गंभीर वळण लागले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के करणार असून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्याचे काम या पथकाकडे सोपविण्यात आले आहे.

या प्रकरणात उमरेड येथील ‘टार्गेट अकॅडमी सायन्स’चा संचालक अतुल जगन चौधरी (वय ३८) याला पोलिसांनी अटक केली आहे. चौधरी हा उमरेडमधील भांडारकर लेआउट परिसरातील रहिवासी असून त्याच्या अकॅडमीचा पेपरफुटीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिस तपासात रसायनशास्त्र (Chemistry), भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Maths) या विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात उमरेड आणि केळवड परिसरातील काही कोचिंग क्लासेसशी संबंधित ४ ते ५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पेपरफुटीचा संबंध उमरेडशी असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली. तपासात असे आढळले की ‘टार्गेट अकॅडमी’ने बोर्ड परीक्षेच्या काही दिवस आधी रसायनशास्त्राची सराव परीक्षा घेतली होती. या सराव परीक्षेतील अनेक प्रश्न प्रत्यक्ष बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते असल्याचे निदर्शनास आले.

Advertisement

दरम्यान, पोलिसांकडून डिजिटल पुरावे तपासले जात असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. शिक्षण मंडळातील काही अंतर्गत व्यक्तींचा या रॅकेटशी संबंध आहे का, याचाही तपास एसआयटीकडून करण्यात येत आहे. या तपासातून पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges