महिला प्रवर्गासाठी राखीव पदे
नागपूर। सावनेर उपविभागातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील पोलीस पाटील या पदाच्या एकूण-191 पदांपैकी रिक्त असलेल्या 133 गावातील पोलीस पाटील पदाची नियुक्ती करावयाची आहे. त्यापैकी एकूण आरक्षित पदांपैकी महिला करिता आरक्षित पदे पुढीलप्रमाणे.
अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता एकूण-25 आरक्षित पदांपैकी महिला प्रवर्गासाठी 7 पदे, अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता एकूण 13 आरक्षित पदांपैकी महिला प्रवर्गासाठी 4 पदे, विमुक्त जाती(अ) प्रवर्गाकरिता एकूण 6 आरक्षित पदांपैकी महिला 2 पदे, भटक्या जमाती (ब) प्रवर्गाकरिता एकूण 5 आरक्षित पदांपैकी महिला 2 पदे, भटक्या जमाती (क) प्रवर्गाकरिता एकूण 5 आरक्षित पदांपैकी महिला 2 पदे, भटक्या जमाती (ड) प्रवर्गाकरिता एकूण 4 आरक्षित पदांपैकी महिला 1 पद, विशेष मागास प्रवर्गाकरिता एकूण 4 आरक्षित पदांपैकी महिला 1 पद, इतर मागास प्रवर्गाकरिता एकूण 35 आरक्षित पदांपैकी महिला 10 पदे व खुला प्रवर्गाकरिता एकूण 36 पदांपैकी महिला 11 पदे या प्रवर्गासाठी महिला राखीव आरक्षण तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
Representational pic