नागपूर : रामझुला हिट अँड रन प्रकरणी रितिका उर्फ रितू मालू हिला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (जेएमएफसी) अर्चना खेडकर-गरड यांनी पोलिस कोठडीच्या आधीच्या फेटाळल्याला आव्हान देणाऱ्या फिर्यादीने दाखल केलेल्या पूनरनिरिक्षण याचिकेवरील सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या सुनावणीत या घटनेतील मालूच्या भूमिकेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद फिर्यादी पक्षाने केला.
न्यायालयाने फिर्यादीची याचिका स्वीकारली. यादरम्यान झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मालूला 10 ऑक्टोबर पर्यंत पोलीस (पीसीआर) कोठडीला मंजुरी देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून रामझुला हिट-अँड-रन प्रकरण त्याच्या कायदेशीर कार्यवाहीमुळे आणि घटनेच्या वादग्रस्त स्वरूपामुळे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान रामझुल्यावर 25 फेब्रुवारी रोजी मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सडिज कार चालवत रितिका मालूने दोन तरुणांना चिरडले. या अपघातात मोमीनपुरा येथील मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34) आणि जाफर नगर येथील मोहम्मद आतिफ (32) यांचा मृत्यू झाला.