Published On : Tue, Mar 19th, 2019

रामटेक व नागपूर लोकसभा निवडणूक :पहिल्याच दिवशी एक नामनिर्देशन पत्र

25 मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

नागपूर-रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सोमवार (दि.18)पासून नामनिर्देशन पत्र स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ऑल इंडिया मजलीस ए ईत्तेहदुल मुस्लीमिन पक्षाचे ए.करीम ए. गफूर (शकील पटेल) यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातून आपले नाम निर्देशन पत्र दाखल केले.

शासकीय सुटीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र दिनांक 25 मार्च 2019 पर्यंत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत स्विकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी येणा-या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.