Published On : Sat, Jul 18th, 2015

नागपूर : कामठीत रमजान ईद साजरी


E
कामठी (नागपूर)।
मुस्लीम अनुयायांचा पवित्र पर्व मानली जाणारी रमजान ईद साजरी करण्यात आली. येथील ईदगाह्त्त मधे सकाळी 9:30 वाजता हकीज सुलतान यांनी रमजान ईद च विशेष नमाज पठन केला. या प्रसंगी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. विशेष नमाज पठन झाल्यावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी समस्त धर्मबांधवांना शुभेच्छा दिल्या.

या शुभप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री अड. सुलेखाताई कुंभारे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस अधिषक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अमित कावे, माजी आमदार राजेंद्र मुळक, माजी आमदार देवराव रडके, माजी नगराध्यक्षा मायाताई चवरे, अ. शकुर नागनी,विवेक मंगतानी प्रामुख्याने उपस्थित होते.

E
शहरातील एकूण 17 मश्जीद तर 1 इदगाह येथे रमजान ईदेची नमाज पठन करण्यात आले. कामठी पोलीस विभागातर्फे सुरक्षेचे उपविभागीय पोलीस अधिक्षक रमेश कतेवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उत्तमराव मुळक, पो.नि. जयेश भंडारकरांच्या मार्गदर्शत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेऊन लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement