Advertisement
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी विमानाला पक्षी आदळल्याने नागपूर-पुणे इंडिगोचे (६३१३५) उड्डाण रद्द करावे लागले. या घटनेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.
सूत्रांनुसार, पक्षी विमानावर आदळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून, विमान कंपनीने प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेसाठी उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे अनेक प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागली.
ही घटना नागपूर विमानतळावर वारंवार घडणाऱ्या समस्येवर प्रकाश टाकते. याअगोदरही या विमानतळावर विमानाला पक्षी आदळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विमानतळ अधिकारी आणि विमान कंपन्या अशा घटनांना आळा घालण्याचे काम करीत आहेत.