Published On : Thu, Feb 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पुनम चेंबर्स अतिक्रमण प्रकरण: ‘त्या’ तीन दुकानांना हायकोर्टाचा दिलासा, उर्वरितवर एनएमसीचा हातोडा!

Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील पुनम चेंबर्स इमारतीतील बेसमेंटमधील बेकायदेशीर दुकानांवर कारवाई सुरू आहे. मात्र या चेंबर्समधील तीन दुकानांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या तीन दुकानांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अतिक्रमणविरोधी कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी बजावण्यात आलेल्या शोकॉज नोटीसच्या आधारे कोणतीही कारवाई उद्यापर्यंत (६ फेब्रुवारी २०२६) करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती अनिल एस. किलोर व न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. विनोद दिनानाथ डिसेजा व इतर यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्रमांक १११६/२०२६ वर सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. श्याम देवाणी यांनी बाजू मांडली.

महत्त्वाचे म्हणजे, पुनम चेंबर्सच्या बेसमेंटमधील दुकान क्रमांक ४४, ४५ व ४६ या केवळ तीन दुकानांवर कोणतीही कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, या आदेशांव्यतिरिक्त इतर बेकायदेशीर दुकानांवर नागपूर महानगरपालिकेची कारवाई सुरूच राहणार असून, एनएमसीने त्यावर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, गुरुवारी (५ फेब्रुवारी) सकाळी पुनम चेंबर्सच्या बेसमेंटमध्ये ‘पुणम बाजार’ नावाने सुरू असलेल्या दुकानांमधील मालसामान बाहेर काढण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून करण्यात येत होती. मंजूर बांधकाम आराखड्याचे उल्लंघन करून बेसमेंटचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचा आरोप महापालिकेने केला आहे.

Advertisement

सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, सदर शोकॉज नोटीस ही २००५ मधील रिट याचिका क्रमांक १९८ तसेच २०१६ मधील रिट याचिका क्रमांक १०२५ या जुन्या प्रकरणांशी संबंधित आहे. त्यामुळे सदर याचिका त्या प्रकरणांसोबतच ऐकली जाणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत, ही याचिका ६ फेब्रुवारी २०२६ रोजी योग्य खंडपीठासमोर सादर करण्याचे निर्देश नोंदणी विभागाला देण्यात आले.

हायकोर्टाच्या आदेशानंतर पुनम चेंबर्समधील या तीन दुकानांची तोडकामची कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली उर्वरितवर एनएमसीचा हातोडा चालवण्यात आला आहे. पुढील सुनावणीकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.