Published On : Sat, Feb 22nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांची “राईड विथ सेफ्टी” मोहीम; विनाहेमलमेट प्रवास करणाऱ्या नागरिकांना केले हेल्मेटचे वाटप !

Advertisement

नागपूर: शहरात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे पाहता नागपूर पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबविण्यात आली. नागपूर वाहतूक विभाग आणि पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी ”राईड विथ सेफ्टी” मोहीम राबविण्यात आली.

सिंगल यांनी २२ फेब्रुवारी, शनिवारी व्हरायटी स्क्वेअर आणि इतर १९ प्रमुख सिंग्नलवर हेल्मेटचे वाटप केले. या कार्यक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला. ज्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची आणि रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्याची शपथ घेतली. यावेळी सुमारे १,००० हेल्मेट वाटण्यात आले.

वितरणादरम्यान सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी, उपायुक्त पोलीस (वाहतूक) अर्चित चांडक आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूरमधील वाहनचालकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. सिंगल यांनी प्राणघातक अपघात टाळण्यासाठी हेल्मेट घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.