Published On : Thu, Aug 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांचा मोठा निर्णय : तीन कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीएसह तडीपार कारवाई

Advertisement

नागपूर :आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. परिमंडळ क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या अजनी व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्ही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए आणि तडीपार कारवाई करण्यात आली आहे.

एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध-

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरमान उर्फ इमरान मलिक रऊफ खान मलिक (३२, रा. सद्भावना नगर, नागपूर) या कुख्यात गुन्हेगारावर तब्बल ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मारहाण, विनयभंग, खंडणी, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर आरोप आहेत. वेळोवेळी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही तो सुधारला नसल्याने त्यास १ वर्षाकरिता एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

दोन वर्षांसाठी तडीपार-

  1. सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे (२७, रा. जयभीम चौक, हिवरीनगर) याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, धमक्या असे एकूण ५ गुन्हे नोंद आहेत. त्याला २ वर्षांसाठी नागपूर शहर व जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले असून नातेवाईकांच्या ताब्यात भंडारा येथे सोडण्यात आले आहे.
  2. रितेश भिमराव गवई (३६, रा. बाबुलखेडा, अजनी) याच्यावर ९ गंभीर गुन्हे दाखल असून त्यात अपहरण, बलात्कार, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आदी गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. तोदेखील सुधारला नसल्याने त्याला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.

गुन्हेगारीत लक्षणीय घट-

मा. पोलीस उपायुक्त रश्मिता राव (भा.पो.से.), परिमंडळ क्र.४ यांच्या आदेशानुसार, सराईत गुन्हेगारांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. यावर्षी जुलै २०२५ अखेर परिमंडळ-४ अंतर्गत एमपीडीए अंतर्गत १० कारवाया व ११ तडीपार कारवाया करण्यात आल्या आहेत. यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शरीराविरुद्ध गुन्ह्यांत १२ ने व मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांत तब्बल १९४ ने घट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांचे हे कठोर पाऊल आगामी सण-उत्सव काळात गुन्हेगारांना आळा बसविण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Gold Rate
July 10 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,400 /-
Gold 22 KT ₹ 1,34,000 /-
Silver/Kg ₹ 2,25,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason Explained | Nagpur Today

Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason...

₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds

₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds

खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident #accident

खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident...

नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional #CentralJail

नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...

पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV #newsupdate

पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges