Published On : Wed, Jul 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘नागपूर पोलीस हेल्थ मिशन’ (टप्पा १) लक्कडगंज पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात संपन्न

Advertisement

भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लक्कडगंज पोलीस ठाण्यात आज भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या विशेष शिबिरात ९० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोफत रक्तशर्करा (Blood Sugar), हिमोग्लोबिन आणि सामान्य आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या शिबिराला पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) सन्माननीय श्री. राहुल मदने सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत परिमंडळ ३ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PIs) देखील याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित होते.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या भव्य शिबिरात भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शालिग्राम भोंगळे, कोषाध्यक्षा डॉ. प्रीती भोंगळे, आणि सचिव श्री. यश भोंगळे उपस्थित होते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून आय.एम.ए. जे.डी.एन. (IMA JDN) चे राज्य सह संयोजक डॉ. सुयश, आय.एम.ए. जे.डी.एन आणि डॉ. बलजित राज्य सहसचिव. नागपूरचे चेअरमन डॉ. चिन्मय, आय.एम.ए. जे.डी.एन. चे महासचिव डॉ. लोकेश, आणि मोफत पॅथॉलॉजी सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘मिठास हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’चे श्री. विवेक प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मुकुंद कावडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले. भविष्यात नागपूरच्या इतर पोलीस ठाण्यांमध्येही हा उपक्रम राबविण्याचा फाउंडेशनचा मानस आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.