नागपूर : शहरातील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत U.O.T.C कॅम्प मध्ये कर्तव्यावर असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.मंगेश मस्के( ब. न.1248 ) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार,आज शनिवार (६ एप्रिल) क्वार्टर गार्ड म्हणून डुटीवर असताना एका खोलीत त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस विभगात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आहे.मंगेश मस्के यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलेले यासंदर्भात अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नसून या दिशेने पोलिसांनी तापस सुरू केला आहे.
दरम्यान कालच पुण्यातील खडक पोलिस ठाण्यांतर्गत लोहियानगर चौकीत पोलिस कर्मचाऱ्याने कार्बाइनमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.भारत दत्ता आस्मर (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
आस्मर हे लोहियानगर पोलिस चौकीत रात्रपाळी कर्तव्यावर असताना या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्याने त्याच प्रकारे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate...
घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra...
अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana #MaharashtraNews
सोनम वांगचुक के समर्थन में बीड में प्रदर्शन | #SonamWangchuk #NEET #paperleak...
यवतमाल में नकली बीज बेचने वालों पर होगी FIR #Farmers #FakeSeeds #Agriculture...
खरपतवारनाशक से धान की पूरी पौध तबाह #maharashtranews #bhiwandi #newsupdate #maharashtra






