Published On : Mon, Sep 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ वायू सर्वेक्षणात नागपूरची दमदार कामगिरी; देशात १०वा तर महाराष्ट्रात पटकावला तिसरा क्रमांक

- १८३.८ गुणांसह राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय स्थान
Advertisement

नागपूर: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण-२०२६’ मध्ये नागपूर शहराने उल्लेखनीय कामगिरी करत देशातील मोठ्या शहरांमध्ये आपली छाप पाडली आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नागपूरने १८३.८ गुणांसह राष्ट्रीय स्तरावर दहावा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील सहभागी शहरांमध्ये नागपूरने तिसरा क्रमांक मिळवला आहे.

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नागपूर महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांना या कामगिरीमुळे यशाची पावती मिळाली आहे. स्वच्छ हवा कृती आराखड्याची अंमलबजावणी, पर्यावरणपूरक ई-बसेस, वृक्षारोपण तसेच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा या कामगिरीत महत्त्वाचा वाटा असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या यशाबद्दल महापौर निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी नागपूरकरांचे अभिनंदन केले. उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनीही नागपूरकरांचे अभिनंदन करत या कामगिरीचे स्वागत केले.

महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. नागपूरकरांचे आरोग्य आणि शहरातील स्वच्छ हवा हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना या सर्वेक्षणातील यशामुळे बळ मिळाले आहे. नागपूरला देशातील प्रमुख राहण्यायोग्य शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी या यशाचे श्रेय महापालिका प्रशासनासोबतच नागपूरकर नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांना दिले. स्वच्छ हवा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेचे विविध विभाग आणि कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. नागरिकांच्या सहकार्यामुळेच हा टप्पा गाठता आला असून, भविष्यात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ई-बसेस आणि वृक्षारोपणावर भर-
शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून पर्यावरणपूरक ई-बसेसचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या वृक्षारोपणाचा सकारात्मक परिणाम आगामी काळात शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर दिसून येण्याची अपेक्षा आहे.

स्वच्छ हवा, हरित नागपूर आणि प्रदूषणमुक्त शहराच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना स्वच्छ वायू सर्वेक्षणातील दहाव्या क्रमांकामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.