Published On : Fri, Nov 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पोलिसांनी ओयो हॉटेलमधून पकडला कुख्यात मोपेड चोर;‘असोपा गँग’चा पर्दाफाश!

Advertisement

नागपूर : शहरातील मोपेड चोरीच्या वाढत्या घटनांवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. क्राइम ब्रांचने कुख्यात चोर ऋषभ असोपा याला दिघोरी येथील ओयो हॉटेलमधून अटक केली. त्यावेळी तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत मजेमस्ती करत होता.

जामिनावर सुटताच ऋषभने पुन्हा चोरीचे सत्र सुरू केले होते. भावासोबत आणि नाबालिग साथीदारासह त्याने अल्पावधीतच अनेक मोपेड गायब केल्या. चौकशीत त्याने गुन्हे कबूल केले असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेल्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

लकडगंज परिसरात झालेल्या अ‍ॅक्टिवा चोरीच्या प्रकरणातून या टोळीचा माग काढला गेला. सीसीटीव्हीत असोपा बंधूंना पाहिल्यानंतर पोलिसांनी माहिती गोळा केली आणि त्यानुसार ओयो हॉटेलवर धाड टाकत ऋषभला ताब्यात घेतले.

चोरीची कमाई उधळण्यात आणि ऐशोआरामात खर्च करणाऱ्या या टोळीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. पुढील तपासासाठी ऋषभ असोपा याला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याचा भाऊ आणि नाबालिग साथीदार फरार आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.