Published On : Thu, Oct 4th, 2018

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या कार्यक्षेत्रातील विभागीय कार्यालय(दक्षिण) क्षेत्रांतर्गत येत असलेल्या मौजा.- बेलतरोडी,ख.क्र. ८९/ए/१-६,८९/बी, येथील औद्योगिक उपयोगाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही आज दिनांक ०३.१०.२०१८ रोजी अंशत: करण्यात आली. कार्यवाही दरम्यान भूधारकाने अभिन्यास मंजुरीसाठी दिनांक २७.०८.२०१८ रोजी अर्ज केल्याचे दस्तावेज दाखविले व कार्यवाही थांबविण्याची विनंती केली व लागणारा दंड भरण्यास संमती दिली.

अभिन्यास मंजुरीकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडे नकाशे सादर केलेले असल्याने अनधिकृत बांधकामधारकास दंडनीय शुल्क रु. ४,००,०००/- लावण्यात आला. ही कार्यवाही तूर्तास थांबविण्यात आली. या कार्यवाहीत सहाय्यक अभियंता श्री.भूपेश मेश्राम,श्री.अनिलकुमार अवस्थी,अतिक्रमणपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील, यांच्या नेतृत्वात पार पडली.

Advertisement

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम मंजूर/नियमित करून घेण्याकरिता अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक ३०.१०.२०१८ पर्यंत असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय मार्फत सूचित करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement