Published On : Wed, May 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर हादरलं;नवविवाहितेच्या मृत्यूचं गूढ उकललं,‘हार्ट अटॅक’ नव्हे तर गळा आवळून हत्या

Advertisement

नागपूर : नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मृतदेह कबरीतून बाहेर काढून करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृत तरुणीची ओळख फाझिला जबीन शेख (वय 19) अशी असून तिचा विवाह जानेवारी महिन्यात नागपूरातील बोरियापुरा परिसरातील जुबेर शेख याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र नंतर हुंड्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, 14 मे रोजी फाझिलाने आईला फोन करून “मला वाचवा” अशी आर्त हाक दिली होती. त्यानंतर काही वेळातच तिचा मोबाईल बंद झाला. नंतर सासरकडून तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याची माहिती देण्यात आली.

फाझिलाचा मृतदेह अमरावती येथे नेल्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी स्नान घालताना तिच्या गळ्यावर संशयास्पद जखमेचे निशाण दिसले. त्यामुळे कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली.

Advertisement

तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेह कबरीतून बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

या प्रकरणात नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती जुबेर शेख, दीर मोहम्मद इरफान आणि सासरे जलील शेख यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी पती आणि दीराला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले आहे. वृद्धापकाळामुळे सासऱ्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Advertisement
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ #Crime #NagpurCrime #HouseTheft #News

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges