Published On : Tue, Feb 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महानगरपालिकेचा नवा विक्रम;मनपात महिलाराज’चा ऐतिहासिक शुभारंभ!

राज्यात पहिल्यांदाच स्थायी, विषय समित्या व झोन सभापतीपदी महिलांची निवड
Advertisement

नागपूर : शहराच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. नागपूर महानगरपालिका येथे आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला. महापौर व उपमहापौर पदानंतर आता स्थायी समितीपासून विविध विषय समित्यांच्या सभापतीपदीही महिलांची निवड करून ‘महिलाराज’ प्रस्थापित करण्यात आले आहे.
सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. राज्यात प्रथमच एखाद्या महानगरपालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व प्रमुख पदांवर महिला नगरसेविकांना संधी देण्यात आल्याने नागपूरने नवा आदर्श निर्माण केला आहे.
भाजपकडून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत सर्वच प्रमुख समित्यांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली. महापौर आणि उपमहापौरपदांवर महिलांची निवड झाल्यानंतर आता स्थायी, परिवहन, स्थापत्य, आरोग्य, शिक्षण, विधी अशा सर्व महत्त्वाच्या विषय समित्यांचे नेतृत्वही महिलांकडे सोपविण्यात आले आहे.
मनपातील प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
महापौर – नीता ठाकरे
उपमहापौर – लीला हात्तीबेड
स्थायी समिती सभापती – शिवानी दाणी
परिवहन समिती – मंगला खेकरे
स्थापत्य समिती – अश्विनी जिचकार
अग्निशमन समिती – मायाताई इवनाते
आरोग्य समिती – मनीषा अतकरे
विधी समिती – निधी तेलगोटे
शिक्षण समिती – संतोषदेवी लड्डा
गल्लीच वस्ती निर्मूलन समिती – ऋतिक मसराम
क्रीडा समिती – दर्शनी धवड
महिला व बालकल्याण समिती – सारिखा नांदुरकर
जलप्रदाय समिती – दिव्या धूरडे
कर आकारणी समिती – सरिता कावरे
या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेच्या कारभारात महिलांची निर्णायक भूमिका राहणार आहे. विकासकामांना गती देताना पारदर्शकता, संवेदनशीलता आणि ठोस निर्णयक्षमतेचा संगम दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागपूरमध्ये सुरू झालेला हा प्रयोग राज्याच्या राजकारणासाठी दिशादर्शक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above