Published On : Tue, Jun 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महापालिकेचा पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव प्रयोग;८४ वर्ष जुन्या वटवृक्षाचे यशस्वी पुनरारोपण

Advertisement

नागपूर – पर्यावरण संवर्धन आणि हरित नागपूरच्या दिशेने नागपूर महानगरपालिकेने एक अभिनव आणि उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या ‘ट्री ट्रान्सप्लांटर मशीन’च्या सहाय्याने तब्बल ८४ वर्ष जुन्या वटवृक्षाचे यशस्वी पुनरारोपण करण्यात आले. हा प्रयोग पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

महानगरपालिकेच्या उद्यान आणि कार्यशाळा विभागाने भांडेप्लॉट येथील शीतला माता मंदिराजवळील एका पिंपळाच्या झाडाचे पुनरारोपण केले. या वेळी महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अपर आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. आणि उपआयुक्त (उद्यान) श्री गणेश राठोड यांची उपस्थिती होती.

‘ट्री ट्रान्सप्लांटर’ या यंत्रासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, या मशीनला प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन क्रमांकही प्राप्त झाला आहे.

भांडेप्लॉट चौकात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या मार्गावर असलेल्या मुखर्जी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाजवळ ८४ वर्ष जुना, सुमारे ३० फूट उंचीचा एक मोठा पिंपळ वाहतुकीस अडथळा ठरत होता. या झाडाचे पुनरारोपण ‘ट्री ट्रान्सप्लांटर’ मशीनच्या साहाय्याने करण्यात आले. झाडाचे खोड आणि मुळे यांना हानी न पोहोचवता ते सावधगिरीने दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले.

Advertisement

‘डकोटा’ कंपनीच्या या मशीनचा वापर महाराष्ट्रात केवळ दुसऱ्यांदाच करण्यात आला आहे. याआधी ठाणे महापालिकेकडे अशा प्रकारचे यंत्र होते. हे मशीन संपूर्णपणे रिमोटच्या साहाय्याने कार्य करते. सुरुवातीला जेसीबीच्या साहाय्याने झाडाभोवती मोठा खड्डा करण्यात आला. त्यानंतर मशीनने झाड उचलून निश्चित केलेल्या ठिकाणी लावण्यात आले.

या मशीनमध्ये १६०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून, झाड उपटताना व पुन्हा लावताना मुळांना ओलसर ठेवण्यासाठी सातत्याने पाणी मारले जाते. त्यामुळे झाडाचे मुळे सुरक्षित राहतात आणि झाड लवकर रुजण्यास मदत होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.