Published On : Fri, Apr 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपाचा इशारा: जनगणना 2027 कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

Advertisement

नागपूर : राष्ट्रीय जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व दहा झोनमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अद्याप कामावर रुजू न झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही शाळा, महाविद्यालये आणि शासकीय तसेच निमशासकीय संस्थांकडून सहकार्य मिळत नसल्याची गंभीर बाबही उघड झाली आहे.

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक संस्थांनी प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्तीचे आदेश स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती न देता अपूर्ण किंवा कमी संख्या दाखवणाऱ्या याद्या सादर केल्या जात आहेत. शहरातील भवन्स, सिव्हील लाईन्स, भारतीय कृष्ण विद्या विहार, तेलंगखेडी, मदन गोपाल अग्रवाल, सिताबर्डी आणि सेंटर पॉईंट, सेमिनरी हिल्स या संस्थांकडून अद्याप कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्यात आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी सर्व दहा झोनच्या सहायक आयुक्तांना कडक निर्देश दिले आहेत. जनगणना 2027 संदर्भातील शासकीय आदेशांचे पालन न करणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच सर्व संबंधित शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांनी तातडीने आदेशांचे पालन करावे, अन्यथा नियमानुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही महापालिकेकडून देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.