नागपूर : शहरात नुकतीच हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली.अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या मागण्यांमध्ये नागपूर महापालिकेच्या विकासकामांसाठीच्या ६८४ कोटींच्या रकमेचाही समावेश आहे.महापालिकेने पाठवलेल्या विकासकामांच्या निधीसंदर्भातील सर्व प्रस्तावांना देवेंद्र फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे, हे विशेष महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावात पूरग्रस्त मदत म्हणून ७८ कोटी रुपयांचा समावेश आहे.
नागपूर महापालिकेने 684 कोटी रुपयांचे ‘पूरक मागण्या’चे प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले होते, त्यात कोणतीही कात्री न लावता सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.महत्त्वाचे म्हणजे
पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेचा प्रस्ताव महापालिकेने पुरवणी मागण्या म्हणून पाठवला होता.
पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये नागपुरातील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी करावयाच्या कामांचे ७८ कोटी रुपयांचे प्रस्ताव होते, तर उर्वरित रक्कम मूलभूत सुविधांच्या विकास कामांशी संबंधित आहे. महापालिकेने पाठवलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शहरातील विकासकामांमध्ये कोणतीही कपात होऊ द्यायची नाही, हेही पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावांना मिळालेल्या मंजुरीवरून दिसून येते.