Published On : Wed, Jul 18th, 2018

नागपूर विधान भवनासमोर मनपा कर्मचा-याचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर – नागपूर विधान भवनासमोर नागपूर महानगरपालिकेतील एका कर्मचा-याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

प्रकाश बर्डे असे या मनपा कर्मचा-याचे नाव आहे. मनपाने 17 कर्मचा-यांना नोकरीतून काढले होते. या कर्मचा-यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने कर्मचा-यांच्या बाजूने निकाल देऊनही मनपाने त्यांना कामावर रुजू करून घेतले नाही.

यामुळे कर्मचा-यांमध्ये असंतोष खदखदत होता. आपल्याला न्याय मिळावा या हेतूने प्रकाश बर्डे याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.