
नागपूर – १५ जानेवारी २०२६ रोजी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू झालेल्या मतदानात सकाळी ९.३० वाजेपर्यंत फक्त ७ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.
शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती पाहायला मिळत असली तरी सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी दिसतोय. प्रशासनाने सर्व नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन देत, अधिकाधिक लोकांनी मतदानाचा हक्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
दुपारी मतदानाचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा असून, प्रशासनाने सुरळीत मतदानासाठी सर्व तयारी केली आहे. मतदारांनी आपल्या हक्काचा योग्य वापर करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणे महत्त्वाचे आहे.
Advertisement








