Published On : Mon, Nov 5th, 2018

अर्बन मोबिलिटी इंडिया २०१८ परिषदेत नागपूर मेट्रोला प्रथम पुरस्कार

Advertisement

११व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ परिषदेची यशस्वी सांगता

नागपूर : ११व्या अर्बन मोबिलिटी इंडिया २०१८ परिषदेच्या समापन समारोहात आयोजित पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाला बेस्ट एक्सिबिशन स्टॉल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित तीन दिवसीय ११व्या अर्बन मोबिलिटी इंडिया २०१८ परिषदेची रविवार सायंकाळी सांगता झाली. या समारोहात विविध स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. समापन समारोहात खासदार डॉ.विकास महात्मे, महापौर, नागपूर. श्रीमती.नंदा जिचकार, महा मेट्रोचे व्य्वास्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, अतिरिक्त सचिव केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास विभाग, भारत सरकार श्री.संजय मूर्ती आणि प्रधान सचिव नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन श्री.नितीन करिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

समापन कार्यक्रमाची सुरवात डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या भाषणाने झाली. डॉ. दीक्षित यांनी ‘चला नागपूर’ संकल्पनेची प्रशंसा करत हा ४था सर्वात मोठा आऊट रिच डे उपक्रम असल्याचे त्यांनी सांगतिले. यासाठी जीआयझेड यांचे विशेष आभार मानले. यासह वॉकथॉन आणि ग्रीन कार्निवल उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले.विदेशातून, देशाच्या विविध राज्यातून आणि शहरातुन आलेल्या प्रतिनिधींनी ही परिषद ऐतिहासिक बनविण्यात महत्वाची भूमिका बजावली. युएमआय परिषदेत आलेल्या तज्ञांचे, प्रतिनिधींचे, विविध शैक्षणिक संस्थातर्फे मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला यासाठी परिषदेचे आयोजन करणाऱ्यांचे आभार मानले.

अर्बन मोबिलिटीसंबंधी आराखडा राज्य सरकारच्या नगर विकास खात्यातर्फे तयार झाला असून या क्षेत्रातील तज्ञांनी आणि इतर नागरिकांनी आराखड्याचा अभ्यास करून यावर सूचना पाठवाव्या ही अपेक्षा नितीन करिर यांनी व्यक्त केली. नागपुरात आयोजित परिषदेच्या प्रत्येक टप्प्यात झालेल्या चर्चासत्रांची त्यांनी प्रशंसा केली. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर चर्चा होणे आज काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोचे नियोजन, फूटपाथ निर्माण करण्यासाठी योग्य आराखडा तयार करणे आवश्यक आहे. वर्तमान काळात केवळ अर्बन मोबिलिटीची संकल्पना वाढत्या खाजगी वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करू शकेल. असे मत करिर यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अनोख्या कल्पनेतून राबविण्यात येणारी ब्रॉडगेज संकल्पनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होण्यास मदत मिळेल. ग्रीन रिव्हॉल्युशन ट्रान्सपोर्ट प्रदूषण रहित असेल. आजची एन्ड ऑफ कॉन्फ्ररेन्स उद्याची स्टार्ट ऑफ पोल्युशन फ्री लाईफ असेल असे वक्तव्य खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

तीन दिवसीय युएमआय परिषदेचे आयोजन नागपुरात झाल्यामुळे ही आपल्या शहरासाठी आनंदाची बाब असल्याचे मत महापौर श्रीमती.नंदा जिचकार यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांनी आयोजनकर्त्याचे आभार मानले. वॉट्स अप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेप्रती नागरिकांना जागृत करण्याचे प्रयत्न नागरिकांनी करावे, तसेच प्रदूषण रहित पर्यावरण शहराची प्रमुख गरज असल्याचे मत देखील त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

शेवटच्या भाषणात संजय मूर्ती यांनी १२व्या अर्बन मोबिलिटी इंडिया २०१९चे आयोजन लखनऊ येथे १५ ते १७ नोव्हेंबर, २०१९ दरम्यान होणार असल्याचे स्पष्ट केले. २०१९ मध्ये होणाऱ्या यूएमआय परिषदेत ‘सहज वाहतूक आणि राहण्यायोग्य शहरे’ या विषयवार विचार मंथन होईल. एकूणच संपूर्ण परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संजय मूर्ती यांनी आनंद व्यक्त केला.

*अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेंस २०१८ विजेत्याची यादी :* (१.) अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेंस २०१८ बेस्ट एक्झीबिटर अवार्ड प्रथम क्रमांक – *महा मेट्रो, नागपूर* ; दुसरा क्रमांक : चलो ; तिसरा क्रमांक : अल्ट्रा पीआरटी लिमिटेड
(२.) बेस्ट नॉन मोटराईजड ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट : कोची मेट्रो रेल लिमिटेड
(३.) बेस्ट सिटी बस सर्विस : कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि बेंगलुरू मेट्रो पॉलीटन ट्रान्सपोर्ट कोर्पोरेशन
(४.) बेस्ट अर्बन मास्ट ट्राजिंट प्रोजेक्ट : हैद्राबाद मेट्रो रेल लिमिटेड आणि सुरत महानगरपालिका
(५.) बेस्ट इंटेलिजट ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि आटोमेटीक फेयर कलेव्क्षन सिस्टम : सुरत महानगरपालिका
(६.) बेस्ट इनिशिएटीव फॉर इमप्रूव्हड रोड सेफ्टी : मध्यप्रदेश पोलीस
(७.) बेस्ट सिटी इन अर्बन ट्रान्सपोर्ट इनिशिएटीव: अहमदाबाद महानगरपालिका
(८.) बेस्ट नॉन मोटराईजड ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट : बृहत बेंगलुरू महानगरपालिका
(९.) बेस्ट सिटी बस सर्विस : बिहार रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि मणिपूर रोड ट्रान्सपोर्ट
(१०.)बेस्ट इंटेलिजट ट्रान्सपोर्ट सिस्टम : अहमदाबाद जनमार्ग लिमिटेड आणि नवी मुंबई म्युनिसीपल ट्रान्सपोर्ट
(११.) बेस्ट इनिशिएटीव फॉर इमप्रूव्हड रोड सेफ्टी : आंध्रप्रदेश पोलीस
(१२.) बेस्ट सिटी इन अर्बन ट्रान्सपोर्ट इनिशिएटीव : सुरत महानगरपालिका आणि हिमाचल रोड स्टेट ट्रान्सपोर्ट
(१३.) हॅकाथॉन स्पर्धा : पहिला पुरस्कार कु. अवनी मेहता; दुसरा पुरस्कार कू.कुशाघ्र सिन्हा; उत्तेजनार्थ पुरस्कार : कु. अनुपमा वरीयार आणि कू.मधुर कुकरेजा
(१४.) उत्कृष्ट पोस्टर स्पर्धा – जेनीज जोज

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement