Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मेट्रो रिच 3.0: डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू; रिंग रोडपर्यंत मेट्रो मार्गिका विकसित होणार

Advertisement

नागपूर: नागपूर मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ‘मेट्रो रिच 3.0’ अंतर्गत डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार करण्याची प्रक्रिया महामेट्रोने सुरू केली असून, ही डीपीआर लवकरच सादर करण्यात येणार आहे.

ही माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित ‘एडवांटेज विदर्भ – खासदार औद्योगिक महोत्सव’च्या समारोपप्रसंगी दिली. रिच 3.0 अंतर्गत शहराच्या रिंग रोडपर्यंत मेट्रो मार्गिका विकसित करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Gold Rate
Feb 9th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,400 /-
Gold 22 KT ₹ 1,46,400 /-
Silver/Kg ₹ 2,63,000 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या बाह्य भागांनाही जलद आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार असून, वाढत्या शहरीकरणाला सामोरे जाण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

तसेच, रिंग रोडपर्यंत मेट्रो पोहोचल्यास शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement