नागपूर: राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसाच्या दौऱ्यावर नागपूरला आगमन झाले. आज पाहलिया दिवशी आयोजित कार्यक्रमात मा. राष्ट्रपती यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. राष्ट्रपतींच्या दौऱ्या निमित्ताने स्थानिक पातळीवर सर्व शासकीय यंत्रणा राबत असतानाच, या संपूर्ण आयोजनात त नागपूर मेट्रोचा देखील सहभाग होता.
या दौऱ्यानिमित्त आलेल्या अति महत्वाच्या व्यक्तींकरिता महा मेट्रो तर्फे इ-रिक्षा च्या माध्यमाने फिडर सेवा देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनि केलेल्या विनंती ला मान देत महा मेट्रो तर्फे हि सेवा देण्यात आली. रुग्णालय परिसरात वाहनतळापासून कार्यक्रम स्थळावर नेण्याकरता हि सोय महा मेट्रो तर्फे करण्यात आली होती आणि या करता ३० इ-रिक्षा तैनात केले होते.
या शिवाय या कार्यक्रमाकरता येणाऱ्या इतर नागरिकांकरिता काँग्रेस नगर स्टेशन येथे देखील ६ इ-रिक्षा तैनात केले होते. या ६ इ-रिक्षच्या माध्यमाने कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोचणे सोपे झाले.