Published On : Sat, Jan 12th, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मेट्रोला दिल्या शुभेच्या

नागपूर :”लवकरच नागपूरकर मेट्रोने प्रवास करणार”अश्या शब्दात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्या महा मेट्रो नागपूरच्या विश वॉल वरून दिल्या. सिव्हील लाईन येथे सुरु असलेल्या कॉम्पेक्स एक्झीबिशन मध्ये लागलेल्या महा मेट्रो स्टॉलची पाहणी करतांना त्यांनी #धावणारमाझीमेट्रो कॅम्पेनची प्रशंसा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर मंडळी महा मेट्रोच्या स्टॉलमध्ये उपस्थित होते.

एक्झीबिशन मध्ये महा मेट्रो स्टॉलवर लागलेली विश वॉल अनेकांच्या आकर्षणाची केंद्र ठरत आहे. आतापर्यंत झालेल्या महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या कार्याची थोडक्यात माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. लवकरच महा मेट्रो नागपूरचे प्रवासी रन होणार असल्याने यासाठी महा मट्रोचे अधिकारी रात्र दिवस कार्य करत असल्याचे श्री. देवेंद्र फडणवीस त्यांना सांगितले.

नागपूर मेट्रोत प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. नव्या वर्षात नागरिकांना देखील मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शुभेच्छा देऊ लागले आहे. नागरिकांच्या या शुभेच्छा आठवणीपूर्वक जपण्यासाठी महा मेट्रो नागपूर द्वारा ‘धावणार माझी मेट्रो विश वॉल’ ची संकल्पना राबविली आहे. धावणार माझी मेट्रो या नावाने हॅशटॅग नागपूरकरांमध्ये प्रसिद्धही झाला आहे. नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजवरही नागरिक उत्स्फूर्त शुभेच्छा देत आहेत. नागरिकांचा उत्साह बघता या शुभेच्छा संकलित करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे *http://wishwall.metrorailnagpur.com* या लिंकवर धावणार माझी मेट्रोला शुभेच्छा देता येतात.

झिरो माईल येथील माहिती केंद्र, लिटिल वूड, मेट्रो हाऊस यासह विविध ठिकाणी महा मेट्रो तर्फे ‘विश वॉल’ लावण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर शहरात येणारे कलाकार देखील या माहिती केंद्रात येऊन आपल्या शुभेच्छा विश वॉल’च्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाला देत आहेत. ‘विश वॉल’ कॅम्पेन मध्ये भाषेचे कोणतेही बंधन नाही. नागरिक आपल्या शब्दात मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देत आहेत. यात लहान मुलांसह, तरुणांचा, महिलांचा आणि जेष्ठ नागरिक उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत.