Published On : Tue, Apr 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एमडी ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; कुख्यात गुन्हेगारासह दोघांना अटक

Advertisement

नागपूर : शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या व्यवहारावर पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा भंडाफोड केला आहे. या कारवाईत एका कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला रंगेहात अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे कमाल चौक येथील शनिचरा मार्केट परिसरात सापळा रचण्यात आला. पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी एमडी विक्रीसाठी येणार असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

या दरम्यान नितेश हेडाऊ याला मोपेडसह ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे १० ग्रॅम एमडी ड्रग्स, एक मोबाईल फोन आणि १२ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १.४५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

चौकशीत नितेश हेडाऊ याने ही ड्रग्स त्याचा साथीदार जगदीश गोखले याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी कपिल नगर येथील म्हाडा क्वार्टरमध्ये छापा टाकून जगदीश गोखले यालाही अटक केली.

Advertisement

दरम्यान, मुख्य आरोपी नितेश हेडाऊ याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि लूट यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सध्या दोन्ही आरोपींकडून पोलिस अधिक चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.