Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

प्रेम, लग्नाचे वचन अन् विश्वासघात; नागपुरात दुसरीकडे साखरपुडा केल्याने तरुणीची पोलिसांत तक्रार

Advertisement

नागपूर : लग्न करण्याचे आश्वासन देत तब्बल सात वर्षे शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत एका २५ वर्षीय तरुणीने २८ वर्षीय तरुणाविरोधात कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या तरुणीसोबत त्याचा साखरपुडा झाल्याचे समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आदमपाडा, लकडगंज येथील अमन गणेश ढाकाटे याची पीडितेशी २०१९ मध्ये सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. काही काळानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीला तिच्या कुटुंबीयांचीही ओळख करून देण्यात आली होती. दोन्ही कुटुंबांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली होती. मात्र, “घरच्यांची संमती मिळाल्यानंतरच लग्न करू,” असे सांगत आरोपी वेळकाढूपणा करत राहिला.

तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पीडिता लग्नाबाबत ठाम भूमिका घेत होती. मात्र आरोपी तिच्याशी टाळाटाळ करू लागला. अखेर ३ जुलै रोजी आरोपीचा दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा झाल्याची माहिती मिळताच पीडिता आणि तिची आई त्याच्या घरी गेल्या. तेथे लग्नास नकार देत त्यांचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Advertisement

यानंतर पीडितेने कळमना पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी खोट्या लग्नाच्या आश्वासनावरून शारीरिक शोषण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.