Published On : Sat, Sep 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर लोकअदालत : ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ कारवाई अंतर्गत तब्बल ५७ लाखांचा दंड वसूल

Advertisement

नागपूर: दारू पिऊन वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी केलेल्या दंडाची वसुली आज (१३ सप्टेंबर) लोकअदालतमार्फत करण्यात आली. एकाच दिवशी तब्बल ५७ लाख ८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. नागपूर शहरातील विविध झोनमधील प्रकरणे लोकअदालत मध्ये ठेवण्यात आली होती. एकूण ९६ प्रकरणांची निकाली काढणी झाली.

लोकअदालत कारवाईत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (दारू पिऊन वाहनचालक) तसेच ई-चलान थकबाकी भरून घेण्यात आली.

झोननिहाय वसुली :

  • अजनी झोन : ₹५.८२ लाख
  • कॉटन मार्केट : ₹६.४२ लाख
  • इंदोरा : ₹४.३७ लाख
  • कंपीटी : ₹५.९१ लाख
  • लकडगंज : ₹५.८० लाख
  • एमआयडीसी : ₹५.९९ लाख
  • सदर : ₹५.४१ लाख
  • सक्करदरा : ₹४.४८ लाख
  • सीताबर्डी : ₹५.८६ लाख
  • सोनेगाव : सर्वाधिक ₹६.९८ लाख

यामध्ये दारू पिऊन वाहनचालकांवर लावलेला दंड, ई-चलान तसेच थकीत दंडाची वसुली करण्यात आली.

या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट संदेश दिला आहे की दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा असून त्यासाठी कडक कारवाई होणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.