Published On : Mon, Oct 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘एमडी विकायला आले का?’ म्हणत तिघांना घेरले; मारहाण करून लूट

Advertisement

नागपुरात ‘एमडी विकायला आले का?’ म्हणत तिघांना घेरले; मारहाण करून लूट

नागपूर : ‘एमडी ड्रग्ज विकायला आले का?’ असा सवाल करत तीन तरुणांना घेरून मारहाण आणि लूट केल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपींनी एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून पळ काढला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा-जमुना सिमेंट रोडवर रात्रीच्या वेळी प्रज्वल सुधीर हा त्याचे मित्र किशन अरविंद पटेल आणि अमन विजय यादव यांच्यासोबत जात होता. त्यावेळी समीर संजय शेख हा आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. तिघांनी तरुणांना एमडी ड्रग्ज विक्रीच्या संशयावरून अडवले. त्यांची झडती घेण्याच्या बहाण्याने शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

यादरम्यान समीर शेख याने रस्त्यावरील दगड उचलून प्रज्वलच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. जखमी प्रज्वलवर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले.

प्रज्वलच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून इतवारी येथील २५ वर्षीय समीर शेख याला अटक केली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लकडगंज पोलीस करीत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.