Published On : Sat, Aug 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

खापरखेडा गँगवॉर प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; 9 आरोपी अटकेत, 15 हून अधिक फरार

Advertisement

नागपूर -नागपूरच्या खापरखेड्यात दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षाप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव, मारहाण आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 15 हून अधिक आरोपी अद्याप फरार आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, एका 17 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती.

खापरखेडा येथील प्रभाग क्रमांक 2 मधील पौनीकर गल्लीत 2 ऑगस्टच्या रात्री दोन गट आमनेसामने आले होते. किरकोळ वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक संघर्षात झाले. यावेळी धारदार शस्त्रांचा वापर करत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचे व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खापरखेडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव, मारहाण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हेमंत ऊर्फ सुदामा मधुकर चाफाडहाके, शांतनू ऊर्फ दद्दू बागडे आणि जितू कनोजिया यांना अटक केली. यासोबतच 17 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, काही आरोपींची यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हेमंत ऊर्फ सुदामाविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता.

दरम्यान, या गँगवॉरमागील पार्श्वभूमीही गंभीर असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी दाखल झालेल्या दंगल प्रकरणात अक्षय ऊर्फ डगम भोसकर याला न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. तर सुमित वंजाळ अद्याप फरार आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, गँगवॉरमध्ये सुमित वंजाळ आणि अक्षय ऊर्फ डगम भोसकर यांना लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, हे दोघेही घटनास्थळी उपस्थित नसल्याने हिमांशू कडू याच्यावर जीवघेणा हल्ला, रक्षित कापसे याच्यासोबत मारहाण आणि रोहित मेश्राम याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, व्हायरल व्हिडिओ आणि दूरध्वनी संपर्काची नोंद तपासली जात आहे. आरोपींच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचीही चौकशी करण्यात येत आहे.

गुन्हे शाखा आणि खापरखेडा पोलिसांची संयुक्त पथके फरार आरोपींच्या संभाव्य ठिकाणांवर सातत्याने छापे टाकत आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक झाली असली, तरी 15 हून अधिक आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींसह या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.