Published On : Thu, Jul 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जलमय ; नाले तुंबले,वस्त्यांमध्ये शिरले पाणी, नागरिकांची तारांबळ!

Advertisement

नागपूर : नागपुरात बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. पूर्व नागपुरात नागनदी भरल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अनेक झोपडपट्टींमध्ये पाणी शिरल्याने पहाटे तेथील नागरिकांना शाळेत आणि समाजभवनात हलविण्यात आले आहे. तसेच शहरातील अंबाझरी तलावही ओव्हर फ्लो झाला.

नंदनवन,भांडेवाडी ,पारडी, वाठोडा या भागांतील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली .

वस्त्याच नाही तर शहरातील अनेक अपार्टमेंटमध्येही पाणी साचले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हे पाहता काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Advertisement

उत्तर नागपुरातील पिवळी नदीच्या काठावरील वस्तीही पाणीमय झाली होती. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पहाटेपासूनच नागरिकांच्या तक्ररी येऊ लागल्या होत्या. याचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून ठिकठिकाणी साचलेले पाणी काढण्याचे काम करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.