Published On : Thu, Nov 1st, 2018

चला नागपूर’ केवळ उपक्रम न राहता दिनचर्या व्हावी : महापौर नंदा जिचकार

Advertisement

मनपा, महा मेट्रो व जीआयझेड इंडियाचा संयुक्त उपक्रम

नागपूर: वाहतुकीची पुरेशी साधने नसताना काही वर्षांपुर्वी आपण जवळचे अंतर पायीच सहज पार करायचो. सद्याच्या युगात सहजतेने उपलब्ध होणाऱ्या साधनांमुळे आपण एखा‌‌द्या मिनिटभराच्या अंतरासाठीही वाहन घेऊन जातो. पर्यावरणाचे संवर्धन व नागरिकांचे फिटनेस या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘चला नागपूर’ हा उपक्रम अत्यंत स्तूत्य आहे. मात्र हा केवळ एक उपक्रम न राहता ही प्रत्येक नागपूरकरांची दिनचर्या व्हावी, अशी अपेक्षा महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement

नागपूर महानगरपालिका, महा मेट्रो व जीआयझेड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला नागपूर’ उपक्रमाच्या समारोप प्रसंगी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. ‘चला नागपूर’ उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता. १) दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी व्हीआयपी मार्गावरील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क येथे उपक्रमाचा समारोप करण्यात आला. समारोप कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार यांच्यासहनागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, सहायक आयुक्त महेश मोरोणे, जीआयझेडच्या ख्रिस्तीएन हेरोनॉमस, ज्यूली रवेन्जी, श्री. दीनदयाल, जीआयझेड स्मार्ट-एसयूटीच्या प्रोजेक्ट मॅनेजर सारा हॅबरसॅक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, चालणे, सायकल चालविणे यामुळे आपल्या शरीराचा पूरेपूर व्यायाम होतो. जीवनात आनंद देणाऱ्या या दोन्ही गोष्टी आहेत. यामुळे भूतकाळात गेलेले आपले जुने आयुष्य पुन्हा जगू शकतोच, शिवाय पर्यावरणासाठीही मोठा हातभार लावू शकतो. नागपुरात सार्वजनिक ईलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढविण्याकडे महानगरपालिकेचा भर आहे. आज शहरात ई-रिक्षा, ई-टॅक्सी आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून शहरात बॅटरी चार्जिंग स्टेशनही आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मनपा तत्पर असून नागरिकांनीही आपल्या दैनंदिन जीवनात वाहनांचा इंधनावरील वाहनांचा वापर कमी करावा, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यावेळी केले.

उपक्रमामार्फत नवी सुरूवात व्हावी : डॉ. रामनाथ सोनवणे
प्रदुषण कमी करणे हे आज जगातील सर्वात मोठे आव्हान आहे. पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. हे कमी करणे आपल्या हातात आहे. त्यामुळे आता ई-वाहनांवर जगाचा भर आहे. याशिवाय पायी चालणे, सायकलने प्रवास करणे या मार्फत आपणही त्यात हातभार लावू शकतो, असे मत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंटकॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले. पृथ्वीला प्रदुषणमुक्त करणे हाच ‘चला नागपूर’ या उपक्रमामागील उद्देश आहे. उपक्रमाच्या मार्फत दिवसभराच्या विविध कार्यक्रमांमुळे, स्पर्धांमुळे आजचा दिवस आनंदात गेला. हा आनंद नागरिकांना रोज जगता यावा, यासाठी दररोज आपण काही प्रमाणात वाहनांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. ‘चला नागपूर’ या उपक्रमाच्या माध्यमातून एक नवी सुरूवात व्हावी, असा आशावादही डॉ. रामनाथ सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement