
नागपूर : नागपूरच्या बालाजी नगर परिसरात प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभाराचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेली एक गौमाता तब्बल पाच तास पावसात रस्त्यावर वेदनेने तडफडत पडून होती. मदतीसाठी सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी वारंवार महापालिकेशी संपर्क साधला, मात्र कोणतीही मदत वेळेत पोहोचली नाही. अखेर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच प्रशासनाला जाग आली.
गुरुवारी रात्री बालाजी नगर येथे भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या गायीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला, तर गंभीर जखमी झालेली गाय रस्त्यावरच कोसळली.
घटनेची माहिती मिळताच धंतोली झोनच्या सभापती भारती बुंदे आणि त्यांचे पती विकास बुंदे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महापालिकेच्या पशू रुग्णवाहिका सेवेशी वारंवार संपर्क साधून मदतीची विनंती केली. मात्र, तब्बल पाच तास कोणतेही पथक घटनास्थळी दाखल झाले नाही, असा आरोप करण्यात आला.
दरम्यान, मुसळधार पावसात जखमी गौमाता वेदनेने विव्हळत होती. स्थानिक नागरिकांनी माणुसकी जपत तिच्यावर कापड टाकून पावसापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जबाबदार यंत्रणा मात्र निष्क्रिय राहिल्याचे चित्र दिसून आले.
शुक्रवारी सकाळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर पशू रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी गौमातेला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
एका मुक्या जीवाला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय होत असेल, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेवगांव अतिक्रमण कार्रवाई पर वंचित का सवाल #maharashtranews #ahilyanagar #maharashtra #news
नासिक में रेड अलर्ट, भारी बारिश जारी #maharashtranews #nashik #newsupdate #maharashtra #news
हतनूर बांध से पानी छोड़ने में बड़ी बढ़ोतरी #maharashtranews #jalgoan #newsupdate #maharashtra
5 घंटे तक सड़क पर तड़पती रही गौमाता!
एमपीएससी पेपर लीक जांच अपराध शाखा #maharashtranews #navimumbai #newsupdate #maharashtra
38 हजार किसान कर्जमाफी योजना में पात्र




