Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अवैध पिस्तूलासह तरुण जेरबंद; तहसील पोलिसांची धडक कारवाई!

Advertisement

नागपूर :नागपूर शहरातील अवैध शस्त्रांविरोधातील मोहिमेदरम्यान तहसील पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयिताला देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. आरोपी हा व्यवसायाने भाजीपाला दलालीचे काम करत असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्याकडे हे शस्त्र नेमके कुठून आले आणि त्यामागचा हेतू काय होता, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गार्ड लाईन परिसरात एक व्यक्ती अवैध शस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती तहसील पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

चौकशीत आरोपीची ओळख इमरान उर्फ टिपू शेख (वय 35) अशी पटली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसामग्रीची अंदाजे किंमत 52 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक तपासात आरोपी हा कलमणा मार्केटमध्ये भाजीपाला दलाल म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. त्याला हे अवैध शस्त्र कोणी पुरवले, त्याचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास तहसील पोलीस करत आहेत.

Advertisement

या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.