Published On : Sat, Nov 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर शहरात अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रवेशबंदी; वाहतूक पोलिसांची नवी अधिसूचना!

२१ नोव्हेंबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू
Advertisement

नागपुर में भारी वाहनों की आवाजाही पर सख्ती, 21 नवंबर से नया ट्रैफिक नियम लागू

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. यापूर्वी सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी होती. मात्र, आता शहरातील निर्धारित मार्गांवर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. ही नवीन अधिसूचना २१ नोव्हेंबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे प्रमुख चौक, रहिवासी परिसर, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि औद्योगिक वसाहतींमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असून, यापूर्वी घडलेल्या प्राणांतिक अपघटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीविताला धोका टाळण्यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

शहरातील विविध मार्गांवर निर्बंध-

वाहतूक परिमंडळ एमआयडीसी अंतर्गत लाव्हा आणि दवलामेटी मार्गावर पुरुषोत्तम चौक ते आठवा मैल तसेच लाव्हा टी-पॉइंट ते खडगाव टी-पॉइंट या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

Advertisement

सोनेगाव वाहतूक परिमंडळात राजीव नगर कटिंग ते सहकार नगर, बाबा सावजी ते प्रतापनगर चौक, पडोळे चौक ते माटे चौक, जयताळा चौक ते मंगलमूर्ती चौक, आयटी पार्क ते संभाजीनगर चौक आणि काचीपुरा चौक ते अलंकार चौक या मार्गांवर दोन्ही बाजूंनी निर्बंध लागू राहतील.

सिताबर्डी वाहतूक परिमंडळात लोकमत चौक ते धंतोली गार्डन, पंचशील चौक ते धंतोली अंडरब्रिज, व्हेरायटी चौक ते लोहापूल, लोहापूल ते झाशी राणी चौक, पंचशील चौक ते अलंकार चौक (कॅनल रोड), रामनगर चौक ते लक्ष्मी भुवन चौक ते धरमपेठ वाय-पॉइंट, लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौक तसेच कॅफे हाऊस चौक ते झेंडा चौक ते धरमपेठ वाय-पॉइंट या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

सदर वाहतूक परिमंडळांतर्गत एलएडी कॉलेज चौक ते शिवाजी चौक (गंगानगर, हजारीपहाड), उत्कर्ष नगर-जoshi फरसान ते फ्रेंड्स कॉलनी चौक, टॉवर लाईनखालून शिवाजीनगर चौक, दिनशॉ फॅक्टरी ते अवस्थी नगर चौक ते कल्पना टॉकीज चौक, नवीन झिंगाबाई टाकळी पुलिया ते जुना काटोल नाका चौक, फरस चौक ते झेंडा चौक गोधणी, पागलखाना चौक ते छावणी वाय-पॉइंट आणि गिट्टीखदान चौक ते रिंग रोड, दुर्गा चौक ते गोरेवाडा चौक या मार्गांवरही निर्बंध लागू राहतील.

अजनी वाहतूक परिमंडळात तुकडोजी पुतळा ते मानेवाडा चौक, त्रिशरण चौक ते शताब्दी चौक, पुरुषोत्तम बाजार ते महाजन आटा चक्की आणि म्हाडगी नगर चौक ते पिपळा फाटा चौक या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

कॉटन मार्केट वाहतूक परिमंडळात कल्याणेश्वर मंदिर ते गंगाबाई घाट चौक, रामकुलर चौक ते दुर्गा माता मंदिर आणि गोलीबार चौक ते मोमिनपुरा चौक या मार्गांवर निर्बंध लागू राहतील. लकडगंज परिमंडळात कमाल चौक ते समर्पण हॉस्पिटल, तर सक्करदरा परिमंडळात बहादुरा फाटा ते नगर पंचायत बहादुरा गाव या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

इंदोरा वाहतूक परिमंडळात बाराखोली चौक, जिंजर मॉल ते इटारसी पुलिया, सुरादेवी मंदिर ते खसाळा-म्हसाळा नाका क्रमांक २, लोणारा-बोखारा मार्गे गोधणी तसेच कोराडी नाक्याकडे जाणारा मार्ग, जरीपटका घाट ते साई मंदिर (ओका बियर बार कटिंग), जुनी वस्ती नारा मार्ग सनसिटी ते कपिलनगर चौक आणि पाटणकर चौक मार्गे भीम चौक ते दयानंद पार्क या मार्गांवर प्रवेशबंदी लागू राहील.

कळमणा वाहतूक परिमंडळात विनोबा भावे चौक ते वनदेवी चौक, विटाभट्टी चौक ते वनदेवी चौक, विटाभट्टी चौक ते कांजी हाऊस व राणी दुर्गावती चौक, नंदी चौक ते मोहम्मद रफी चौक, शांतिनगर पुलिया-कामठी रोड ते गॅस तसेच टिपू सुलतान चौक ते शिवाजी चौक आणि टिपू सुलतान चौक ते यशोधरानगर चौक या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहील.

पारडी वाहतूक परिमंडळात हनुमान मंदिर चौक ते पुनापूर रोड, खरबी चौक ते गरीब नवाज नगर रोड (बहादुरा) आणि हनुमान मंदिर चौक-भांडेवाडी रेल्वे स्टेशन ते तरोडी गाव या मार्गांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कामठी वाहतूक परिमंडळात साई मंदिर ते जयस्तंभ चौक, जयस्तंभ चौक ते आशा हॉस्पिटल चौक, कळमणा टी-पॉइंट ते खैरी उड्डाणपूल, आशा हॉस्पिटल ते खैरी गाव कटिंग उड्डाणपूल तसेच अजनी गादा ते जयस्तंभ चौक या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.
परवानगीशिवाय प्रवेश केल्यास कारवाई-

अधिसूचनेनुसार, निर्धारित मार्गांवर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. या बंदीच्या वेळेत संबंधित मार्गांवर प्रवेश करणे आवश्यक असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक विभाग यांची परवानगी घेणे बंधनकारक असेल. अवजड वाहन चालकांनी अधिसूचनेचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त (वाहतूक) आदित्य मिरखेलकर यांनी केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.