Published On : Tue, Oct 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का? अभिजीत वंजारींची 785 मतांची आघाडी

Advertisement

नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यावर 785 मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीअखेर वंजारी यांना 28 हजार 536, तर कोहळे यांना 27 हजार 751 मते मिळाली. नितेश कराडे यांनी 14 हजार 243 मते मिळवत निवडणुकीतील चुरस वाढवली आहे.

84 हजार मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर वंजारी आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. या आघाडीमुळे भाजपच्या गोटातील धाकधूक वाढली असून, नागपूर पदवीधर मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या आकडेवारीला निवडणूक विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अंतिम निकालाबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. उर्वरित मतमोजणीत आघाडी कायम राखण्यात वंजारी यशस्वी ठरतात की कोहळे बाजी मारतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.