Published On : Wed, Sep 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गोरेवाड्यात महिला कारचालकाचा कहर; भरधाव सेल्टॉसने ७ जणांना उडवले

तीन चिमुकल्यांचाही समावेश
Advertisement

नागपुर में तेज रफ्तार सेल्टॉस ने मचाया कहर, तीन बच्चों समेत कई लोग घायल

नागपूर : गोरेवाडा परिसरातील दिनशॉ फॅक्टरीजवळ मंगळवारी रात्री भरधाव सेल्टॉस कारने धुमाकूळ घातल्याची घटना घडली. महिला चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने प्रथम एका एसयूव्हीला धडक बसली. त्यानंतर रस्त्यावरील तीन चिमुकल्यांसह सुमारे सात जणांना कारने धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला चालक सेल्टॉस कार घेऊन जात असताना भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा आरोप आहे. कारने सर्वप्रथम बालू कुलमेथे यांच्या एसयूव्हीला धडक दिली. त्यावेळी बालू हे आपल्या मुलीसह वाहनातून खाली उतरत होते. त्यानंतर अनियंत्रित कारने रस्त्यावर असलेल्या तीन मुलांसह इतर नागरिकांना धडक दिली.

Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,400 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,33,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अपघातात गोदनी येथील हरीश रामभाऊ रेवतकर, नारा येथील आशीष नखाते यांच्यासह सुमारे सात जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घालत महिला चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Advertisement

दरम्यान, महिला चालकाने मद्यप्राशन केले असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, वैद्यकीय अहवालानंतरच नशेत वाहन चालवले होते की नाही, हे स्पष्ट होणार आहे. अपघाताचा नेमका घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. DCP अन्नपूर्णा सिंग यांनी या प्रकरणी माहिती दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.