Published On : Wed, Aug 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप

Advertisement

नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) निवासी डॉक्टरांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. शासनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सेंट्रल मार्ड (MARD) संघटनेने आंदोलनाची घोषणा केली.

आज सकाळपासून निवासी डॉक्टर ओपीडीसमोर धरणे आंदोलन करत आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांवर शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉक्टरांनी शासनाला २४ तासांचा अल्टिमेटम देत, या कालावधीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच आवश्यक सेवा बंद करण्याचाही निर्णय घ्यावा लागू शकतो आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संपामुळे रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवेवर परिणाम होण्यास सुरुवात झाली असून रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

आंदोलनकर्त्या निवासी डॉक्टरांनी शासनाने तातडीने मागण्यांवर निर्णय घ्यावा, जेणेकरून रुग्णसेवा सुरळीत राहील आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी मागणी केली आहे.

Advertisement
अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...

ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews #News

ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews...

तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews...

चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate #news

चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate...

जाति आधारित जनगणना पर बावनकुले का बड़ा दावा #vidarbhanews  #maharashtranews #newsupdate #news

जाति आधारित जनगणना पर बावनकुले का बड़ा दावा #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges