Published On : Tue, Sep 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘फॉरेन ग्रूम स्कॅम’चा पर्दाफाश; मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांना गंडा, सहा जणांना अटक

Advertisement

नागपुरात ‘फॉरेन ग्रूम स्कॅम’चा पर्दाफाश; मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांना गंडा, सहा जणांना अटक

नागपूर : परदेशी वर असल्याचे भासवून मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून महिलांशी संपर्क साधत त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. वर्धमाननगर परिसरातील भाड्याच्या बंगल्यातून पोलिसांनी सहा जणांना अटक केली. या टोळीने फसवणुकीतून मिळालेली रक्कम हवालामार्फत दुबईला पाठवल्याचा संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणाची सुरुवात नागपुरातील एका महिलेच्या तक्रारीनंतर झाली. मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवरून काही जणांनी तिच्याशी संपर्क साधून स्वतःला परदेशी नागरिक असल्याचे सांगितले. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी महिलेला महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर हे गिफ्ट कस्टम विभागाकडून अडवण्यात आल्याचे सांगून कस्टम क्लिअरन्स, शुल्क आणि अन्य कारणांसाठी महिलेकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे मिळाल्यानंतरही आरोपींकडून विविध कारणे सांगून आणखी पैशांची मागणी केली जात होती. काही वेळेनंतर पीडितेशी संपर्क तोडला जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.

तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. डीसीपी दीपक अग्रवाल यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी सापळा रचून वर्धमाननगर येथील भाड्याच्या बंगल्यातून सहा संशयितांना अटक केली.

Advertisement

या टोळीने आणखी किती महिलांना अशाच पद्धतीने लक्ष्य केले, याचा तपास सुरू आहे. आरोपींचे मोबाइल, डिजिटल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार पोलिसांकडून तपासले जात असून, फसवणुकीची रक्कम हवालामार्फत दुबईला पाठवण्यात आली का, याचाही तपास केला जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.