Published On : Mon, Jun 1st, 2015

नागपूर : हिवताप, डेंग्यु, चिकनगुनिया सारखे आजाराबाबद जनजागरण मोहीम


Dengu Maleriya awerness Janjagaran Mohim Photo 01 Jun 2015
नागपूर।
हिवताप, डेंग्यु, चिकनगुनिया सारखे आजाराबाबद जनजागरण मोहीमें अंतर्गत जनते मध्ये राष्ट्रीय किटजन्य आजाराबाबद माहिती असावी, या उद्देशाने आरोग्य विभागातील हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत शहरातील विभागाचे १० झोन अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असुन, त्यानुसार प्रभागातील गाळे धारक, व्यापारी, कारखाने, मोठे मोठे उद्योग धंदे या ठिकाणी प्रत्यक्ष तयार केलेल्या टिम नुसार कार्य करीत आहे व जनते मध्ये आरोग्य शिक्षण बाबत पार्क, बागीचे, शाळा, विहार, आंगणवाडी, बचतगट, स्थानीय संस्था, महिला मंडळ, सार्वजनिक स्थाने इत्यादी झोनअंतर्गत रोगविषयाचे संबंधाने प्रशिक्षणाच्या माध्यमातून सभा घेण्यात येत आहे.

विभागा अंतर्गत गाळे धारकांना नोटीस देण्यात येत असून त्या ठिकाणी पत्रके, पोस्टर लावण्यात येत आहे. त्याच प्रमाणे शाळेतील संचालकांना मुलांच्या आरोग्याच्या दृष्टी ने सतर्कतेचा नोटीस वाटप करण्यात येते. तसेच घरोघरी टीम द्वारे डासोत्पत्ती स्थानेचा शोध घेण्यात येत असुन ज्या घरामध्ये डासअळ्या आढळून आल्यास त्यांना समज देवून स्थाने नष्ठ करण्याचे कार्य शुरू आहे.

Copy of Dengu Maleriya awerness Janjagaran Mohim Photo 01 Jun 2015
विभागा अंतर्गत अनेक प्रकारचे योजना राबविण्यात येत असून अळीनाशक फवारणी, डासोत्पत्ती स्थाने, रुग्णांचा शोध, दवाखान्यामध्ये भर्ती असलेल्या रुग्णांची माहीती घेण्यास येत आहे. तसेच जनतेने वापरावयाचे पाणी वरचेवर खाली करून डासअळी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी व रोगानुपासून मुक्त व्हावे.