नागपूर: मेडिकल कॉलेजच्या फिजिओथेरपी विभागातील असिस्टंट प्रोफेसरच्या खुनाचा उलगडा झाला आहे. डॉक्टर पतीच खून करणारा निघाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने तिची निर्घृण हत्या केली.
फिजिओथेरपी विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या डॉ. अर्चना अनिल राहुल (वय ५०, रेसिडेन्स प्लॉट नं. ६७, लाडेकर ले-आउट, हुडकेश्वर) यांचा मृतदेह शनिवारच्या संध्याकाळी त्यांच्या घरात रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडला. प्रथमिक तपासात त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून खून झाल्याचे समोर आले.
डॉ. अर्चनाचे पती, डॉ. अनिल, रायपूर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, नागपुरात आल्यानंतरच त्यांना पत्नीचा मृतदेह दिसला. मात्र पोलिसांच्या तपासात उघड झाले की डॉ. अनिल गेल्या चार–पाच महिन्यांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो वारंवार तिच्याशी वाद घालत असे आणि तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत असे.
डॉ. अर्चना यांनी ही माहिती त्यांची बहिणी डॉ. नीमा सोनारे यांना फोनवर आणि प्रत्यक्ष दिली होती. शनिवारी रात्री सुमारे नऊ वाजता डॉ. अनिल नागपुरात आले आणि त्यांनी लोखंडी रॉडने अर्चनाच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर ते घराबाहेर गेले आणि परत आल्याचे नाटक केले. शेजाऱ्यांना ओरडून बोलावले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
मात्र डॉ. नीमा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर खरा गुन्हेगार उघड झाला. पोलिसांनी डॉ. अनिलला ताब्यात घेतले आणि चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
खोटं बोलून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न डॉ. अनिल आठवड्यातून एक-दोन वेळा नागपूरला येत असत आणि प्रत्येकवेळी अर्चनाशी वाद घडत असे. खून केल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांसमोर खोटं नाटं रचून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्चनाच्या बहिणीच्या तक्रारीमुळे त्यांचा कट उघडकीस आला.