Published On : Wed, Mar 9th, 2022
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या, 36 व्या वर्षी टोकाचं पाऊल

Advertisement

नागपूर : ‘परम का ढाबा’ (Param ka Dhaba) या नागपुरातील (Nagpur Suicide) प्रसिद्ध हॉटेलच्या संचालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोनी भुपेंद्र राजपूत (Soni Rajput) यांनी कामठी रोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. नागपुरातील फूड लव्हर्समध्ये ‘परम की दाल’ प्रसिद्ध आहे. या ढाब्याच्या संचालकाने ऐन तारुण्यात आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनी राजपूत हे 36 वर्षांचे होते. आत्महत्या करताना सोनी घरी एकटेच होते.

मुलगा आणि पत्नी पंजाबला गेले असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. सोनी यांचा गळफास लागलेला मृतदेह घरात सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नागपूरच्या तरुणाईमध्ये त्यांच्या ढाब्यातील ‘परम की दाल’ हे आकर्षणाचं केंद्र आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काय आहे प्रकरण?
‘परम का ढाबा’ या नागपूर शहरातील प्रसिद्ध ढाब्याचे संचालक सोनी भुपेंद्र राजपूत यांनी आत्महत्या केली. ते 36 वर्षांचे होते. कामठी रोड येथील राहत्या घरी मंगळवारी सकाळी त्यांनी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचं समोर आलं आहे.

मुलगा आणि पत्नी पंजाबला गेले असल्याने सोनी घरी एकटेच होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नातेवाईकांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवलं. पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला.

Advertisement

आत्महत्येचं कारण अस्पष्ट
पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

यूट्यूबर्समध्ये सुप्रसिद्ध
नागपुरातील लकडगंज भागात असलेल्या त्यांच्या हॉटेलमधील ‘परम की दाल’ फूड लव्हर्समध्ये प्रसिद्ध आहे. यूट्यूबवरही त्यांचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. या घटनेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.