
कामठी : कळमना रोडवरील खासगी रुग्णालयातील डॉक्टरकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालय आणि डॉक्टरांची बदनामी करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. डॉक्टरांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी गुलाम नजर शेख मोहम्मद याला अटक केली. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. तन्जीम आजमी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ जून रोजी पोटदुखी आणि शौचास त्रास होत असल्याने आरोपी पत्नीसमवेत रुग्णालयात आला होता. आयुष्मान कार्ड नसतानाही डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. तपासणी, सीटी स्कॅन आणि आवश्यक उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले.
यानंतर आरोपीने समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून, पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात १७ दिवस दाखल नसतानाही ४० हजार रुपयांचे बिल आकारल्याचा आरोप केला. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर डॉक्टर आणि आरोपीमध्ये चर्चा झाली. गैरसमज दूर झाल्याचा व्हिडीओही समोर आला. मात्र, त्यानंतर पुन्हा रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात आरोप करणारे व्हिडीओ प्रसारित केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, २१ ऑगस्टच्या रात्री समाजमाध्यमांवर बदनामीकारक व्हिडीओ आढळल्यानंतर त्यांनी आरोपीशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपी काही जणांसह रुग्णालयात आला. उपचारासंदर्भातील संपूर्ण माहिती दिल्यानंतर आरोप चुकीचे असल्याचे त्याने मान्य केले आणि त्याबाबतचा व्हिडीओही तयार केला.
मात्र, २२ ऑगस्ट रोजी आरोपी पुन्हा रुग्णालयात आला. समाजमाध्यमांवर बदनामीकारक व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. तक्रारीच्या आधारे नवीन कामठी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
दरम्यान, आरोपीच्या कुटुंबीयांकडून त्याला जबरदस्तीने घेऊन जाऊन अपहरण केल्याचा दावा करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करत पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate




