Published On : Thu, Jun 20th, 2019

नागपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाची बैठक 22 जुनला संघटनेच्या विविध बाबींवर होणार चर्चा

रामटेक : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वर्तमानपत्र असून ग्रामीण पत्रकार संघाची नागपुर जिल्हा कार्यकारिणीची बैठक दिनांक 22/6/2019 शनिवारला रामटेक येथील जिल्हा कार्यालयात रामालेश्वर वार्ड, रामटेक येथे दुपारी 1 वाजता ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अध्यक्षा चंदाताई शिरसाट यांचे आदेशानुसार आयोजित केलेली आहे. यामधे कार्यकारणीत सर्वानुमते नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात येणार आहे.

संघटनेच्या विविध बाबींवर चर्चा होणार असून संघटनेचे नवीन पदाधिकारी नेमण्यात येणार आहेत. न चुकता मीटिंगला नियोजित वेळेवर हजर राहावे ,असे आवाहन जिल्हा सचिव संजय अलोने यांनी केले आहे .

ज्या पत्रकारांना नागपूर जिल्हा कार्यकारिणीत आपल्या नावाची नोंदणी करून सदस्य बनण्याकरीता इच्छुक असेल त्यांनी ग्रामीण पत्रकार संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राकेश मर्जिवे तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा शैलेश रोशनखेड़े यांचेशी त्वरित सम्पर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण पत्रकार संघातर्फे केले आहे .