नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि निलंबित आमदार सुनील केदार यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. केदार यांनी त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल समोर आला असून उच्च न्यायालयाने केदार यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली.
सुनील केदार याने न्यायालयाच्या आदेशाविरोधात सहकार मंत्रालयात याचिका दाखल केली आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील या याचिकेवर आज सुनावणी झाली. आमदार केदारांना 15 दिवसांत बाजू मांडण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहे. जिल्हा बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी केदार यांना 15 दिवसांच्या आता लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश सहकार मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.
दरम्यान एनडीसीसी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सुनील केदारला दोषी ठरवून पाच वर्षांच्या तुरुंगवासासह १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
यासोबतच 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या मोबदल्यात आतापर्यंतच्या व्याजासह 1444 कोटी रुपये आरोपींकडून वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने सहकार मंत्रालयाला दिले होते. न्यायालयाच्या आदेशाविरोधात केदार यांनी संबंधित मंत्रालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.