Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खळबळ; धंतोलीतील एकाच कुटुंबातील पाच जण 24 जूनपासून बेपत्ता

मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यातले
Advertisement

नागपूर : नागपुरातील धंतोली परिसरातून एकाच कुटुंबातील पाच सदस्य रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 24 जूनपासून हे सर्वजण बेपत्ता असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात आढळल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुणे पोलिसांशीही समन्वय साधण्यात आला आहे.

धंतोलीतील बलराज मार्ग येथे राहणारे परसवानी कुटुंबातील हर्षा परसवानी, जितेंद्र परसवानी, ईशिता परसवानी, 21 वर्षीय खुशी परसवानी आणि 12 वर्षीय कृष्णा परसवानी हे 24 जूनच्या सायंकाळी घराबाहेर पडले. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

सुरुवातीला नातेवाईकांकडे गेले असावेत, असा कुटुंबीयांचा समज होता. अनेक दिवस स्वतः शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने 29 जून रोजी धंतोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

तांत्रिक तपासादरम्यान पाचही जणांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात आढळून आले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधत तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

Advertisement

तपासात कुटुंबातील एका सदस्यावर मोठे कर्ज असल्याची माहिती समोर आली असली, तरी याच कारणामुळे कुटुंब बेपत्ता झाले, असे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. सर्व शक्यतांचा विचार करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

एकाच कुटुंबातील पाच सदस्य अचानक बेपत्ता झाल्याने नागपुरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.